अत्यंत नाजूक आणि ठराविक हवामानात येणारी ‘स्ट्रॉबेरी’ उस्मानाबाद जिल्ह्याच्या मातीतही पिकवून शेतकरी श्री.वैभव विश्वंभर सूर्यवंशी रा. तोरंबा यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी, शेती संबंधित व्यवसायांसाठीच्या विविध योजनांची माहिती घेऊन सर्वांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात केले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी, विशेषतः युवा पिढीने केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, अत्याधुनिक पद्धतीने उत्पादन कसे करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
यापुर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात पाॅली हाऊस, शेड नेट यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जरबेरा फुल शेतीचे यशस्वी प्रयोग झाले आहेत मध्यंतरी सफरचंद व कमी पाण्यात येणारे ड्रॅगन फ्रूट लागवड सुद्धा झालेली आहे. या पिकांसाठी येणारा लागवड खर्च जरी जास्त असला तरी योग्य व्यवस्थापन करून बाय प्रॉडक्ट्स च्या माध्यमातून भरपूर नफा मिळू शकेल.
More Stories
पशुसंवर्धन विभागामार्फत कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे आयोजन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय, बार्शी येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न