उस्मानाबाद जिल्ह्याचे ऐतिहासिक महत्व पाहिले असता अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारे ऐतिहासिक पुरावे, साधने, अवशेष आजही या परिसरात आढळून येतात. नंतर पुढे निजामशाही व ब्रिटिश काळातही हा ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा ठरतो. तसेच स्वातंत्र्य संग्रामात देखील या जिल्ह्याचे मोलाचे योगदान आहे.
याची कडी जोडणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज इतिहास व पुरातत्त्व अभ्यासक जयराज खोचरे यांच्या हाती आला आहे.
उस्मानाबाद येथील इतिहास व पुरातत्व अभ्यासक श्री. जयराज खोचरे हे गेली अनेक वर्षे मुर्ती, शिल्प, शिलालेख , लेणी, मंदिर, किल्ले यावर संशोधन व अभ्यास करत आहेत. नवीन सापडलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू व दस्तावेज त्यांनी या याआधी प्रकाशात आणले आहेत.
त्यांना त्यांच्या जुन्या घरातील माळवदात ठेवलेली अठराव्या – एकोणिसाव्या शतकातील तलवारीची म्यान सापडली.
खोचरे यांचे पणजोबा हे मराठा लाईट इंफन्ट्री मध्ये सैनिक होते याचा पुरावा म्हणजे त्यांच्याकडे असणारे त्याकाळातील डिस्चार्ज लेटर आज ही त्यांच्या कडे व्यवस्थित जतन ठेवलेले आहे.
त्यांच्या पंजोबाचे नाव नागुराव नारायण खोचरे असून ते घोडेस्वार म्हणून लष्करी सेवा करत होते. जुन्या लोकांकडून ऐकण्यात आलेल्या गोष्टी पैकी एक हकीकत त्यांनी इथे सांगितली की या सरकारी असणाऱ्या घोड्याला सोलापूर वरून दर आठवड्याला एक पोते चने येत असत.
आजच्या कावलदरा येथे निजाम काळात चेक पोस्ट होते त्यावेळी त्यांनी त्याठिकाणी एक चोर पकडल्याची नोंद हि तत्कालीन कागदपत्रात नमूद आहे. त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रासह गदग या प्रांती हि झाली होती. त्यांच्या पत्नी या डाळिंबच्या पोलीस पाटलांची कन्या होती.
हाच धागा पकडून खोचरे हे याबद्दल सखोल संशोधन करत असता त्यांना जुन्या वाड्यात ऐतिहासिक वारसा असलेली अनमोल अशी म्यान सापडली आहे.
ही म्यान पोलादी असून कमरेला लावण्यासाठी दोन गोल रिंग याला आहेत ही म्यान अजून हि सुस्थिती मध्ये आहे मात्र यातील तलवार गहाळ झालेली आहे.
आज आपल्याला मध्ययुगीन काळातील बऱ्याच तलवारी पाहिला मिळातात पण जिल्ह्यात अशी म्यान क्वचितच कोणाकडे असेल. ही म्यान तेर येथील कै. रामलिंग आप्पा लामतुरे वास्तू संग्राहालयाला देणार असल्याचे श्री. खोचरे यांनी सांगितले.
©जयराज खोचरे
इतिहास , पुरातत्व अभ्यासक व लेखक
7020928941
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद