श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा हा पुरस्कार विश्वास पाटील यांना (दि. 9) राजभवन येथे प्रदान करण्यात आला. जेष्ठ साहित्यिक हस्तिमल हस्ती यांना 2020 या वर्षासाठीचा राजीव सारस्वत सन्मान प्रदान करण्यात आला.

विश्वास पाटील हे मराठीतले लेखक व भारतीय प्रशासकीय सेवेत निवृत्त अधिकारी आहेत.आजवर त्यांच्या अनेक ऐतिहासिक कादंबर्या,लेख संग्रह,चरित्र, कादंबऱ्या,नाटके लिहिलेली आहेत त्यांच्या पानिपतला प्रियदर्शनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार व कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारांसह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले आहेत तर झाडाझडतीला १९९२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
सुप्रसिध्द साहित्यिक, कवी व हिंदुस्थान पेट्रोलियम येथे महाव्यवस्थापक (राजभाषा) पदावर कार्यरत असलेल्या राजीव सारस्वत यांचे मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 च्या अतिरेकी हल्ल्यात निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रुती संवाद साहित्य कला अकादमीतर्फे साहित्यिकांना ‘राजीव सारस्वत सन्मान’ देण्यात येतो.
कार्यक्रमाला श्रुती संवाद अकादमीचे अध्यक्ष अरविंद राही, हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक पुष्प जोशी, महासचिव डॉ. अनंत श्रीमाली आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वागीश सारस्वत, संजीव निगम तसेच इतर निवडक साहित्यिकांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर