Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > कोरोना अपडेट > परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे नवरात्र उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

परांडा तालुक्यातील खंडेश्वरवाडी येथे नवरात्र उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

मित्राला शेअर करा

खंडेश्वरवाडी ता.परंडा जि.धाराशिव येथे विश्व जन आरोग्य सेवा समिती महाराष्ट्र राज्याच्या संस्थापक अध्यक्षा छायाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व अगदी ग्रामीण भागात जागृती निर्माण करून तरुणांना रक्तदानासाठी प्रेरित करणारी विश्व जन आरोग्य सेवा समिती धाराशिव व विश्व मराठा संघ धाराशिव आणि ग्रामस्थ खंडेश्वरवाडी ता.परंडा यांनी नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामस्थ मंडळ खंडेश्वरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

विश्व जन आरोग्य सेवा महाराष्ट्रात आरोग्य वर काम करते.
सध्या राज्यात कोरोनामुळे तसेच लसीकरणामुळे रक्ताचा खूप मोठा तुटवडा झालेला आहे त्याच पार्शवभूमीवर कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. सुसेन जाधव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.शिबिरामध्ये गावातील तरुणांनी मोठ्या प्रमाणात लोकांना प्रोत्साहित करून रक्तदान करून घेतले.

यावेळी विश्वजन आरोग्य समितीचे धाराशिव जिल्हा समन्वयक तथा विश्व मराठा संघ धाराशिव चे जिल्हाध्यक्ष श्री.सोमनाथ कोकाटे, परंडा आरोग्य दूत राहुल शिंदे,तालुका आरोग्य सदस्य रविंद्र तांबे , रावसाहेब काळे पाटील विश्व मराठा संघ तालुका अध्यक्ष परंडा, श्री. सुसेन जाधव(अध्यक्ष) विक्रम बोबलट(रो. से.)ग्रा. सदस्य,बालाजी नलवडे, सोमनाथ जाधव, अप्पासाहेब सव्वासे, रमेश काळे. धनंजय राजेभोसले, (भूम, परंडा, वाशी विधानसभा उपाध्यक्ष )अक्षय रणखांब, धनंजय रंदवे, विठ्ठल जाधव (ग्रा. शि.)मंडळाचे सर्व सदस्य व गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.