दि . 8 ऑगस्ट – महाराष्ट्र विद्यालय, बार्शी या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डाक विभाग व महाराष्ट्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांच्या सहकार्याने ‘पत्रलेखन’ हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
आजच्या संगणक व मोबाईलच्या युगात पत्र लिहिणे ही बाब बाजूस राहिलेली आहे परंतु ही बाब एक छान उपक्रम म्हणून ठरू शकते हे लक्षात आल्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सूचना देऊन यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या उपक्रमास प्रतिसाद देत महाराष्ट्र विद्यालयातील 1500 विदयार्थ्यांनी आपल्या प्रियजन नातेवाईक मित्र आप्तेष्ट यांना ‘झाडे लावा व झाडे जगवा’ हा संदेश तसेच वृक्षलागवडीचे महत्त्व सहभागी सर्व पत्रलेखक विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आपापल्या पत्रातून लिहिला आहे.
या सर्व पत्राचे संकलन विद्यालयातच मा. मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर उपमुख्याध्यापक मा. श्री. सपताळे सर तसेच मा. श्री. उदय पोतदार तसेच दिव्य मराठीचे श्री. धारूरकर व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत पोस्टाच्या पेटीत करण्यात आले. त्यानंतर श्री. धारूरकर यांनी टि. व्ही. 9 या न्यूज चॅनेल साठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर व सपताळे सर यांची मुलाखत घेण्यात आली. या पत्रलेखन उपक्रमाबाबत वृक्षसंवर्धन समिती व विद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
वृक्षसंवर्धन समितीचा हा पत्राचा उपक्रम बार्शी शहर तसेच ग्रामीण भागात फारच सुंदर रीत्या राबविला गेला या उपक्रमाने ही चळवळ अंदाजे ४०००० लोकांपर्यंत जाणार आहे. शहरा मध्ये या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांकडून समितीच्या कार्याचे कौतुक केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद