पैठण : विश्व जन आरोग्य सेवा समिती ही राज्यातील आरोग्य विषयक सेवा पुरविणारी तसेच रुग्णांचे प्रश्न हाताळनारी संघटना आहे. या अनुषंगाने सोमवार, ४ रोजी पिंप्रिराजा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर सभागृहात लायन्स क्लब चिकलठाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य नेत्र तपासणी शिबिर, मोफत शस्त्रक्रिया “मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नंबरचे चष्मा असा भव्य उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिराला गावातील अबाल-वृद्ध,थोरा मोठ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.दरम्यान गावातील तब्बल १५० जणांनी नेत्र तपासणी शिबिरात सहभाग नोंदवला.तसेच मोफत शस्त्रक्रिया, मोतीबिंदू यासाठी २५ वयस्कर नागरिकांनी नोंद केली आहे. या शिबिराचे गावातील नागरिकांकडुन कौतुक होत असुन हे शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समितीचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर माने,प्रतिक गावंडे,राधा लाटे, आणि योगेश काळे आदींनी नियोजन केले होते.
या शिबीरास संस्थापक अध्यक्ष छायाताई भगत, प्रदेश समन्वयक रवींद्र पाटील,अनिल राऊत, रामेश्वर बावणे, भगवान सोरमारे, अमर हजारे, प्रदेशाध्यक्ष हनुमंत तांगडे,ट्रस्ट अध्यक्ष आप्पासाहेब गावंडे,अमोल जाधव, तसेच लायन्स क्लब सदस्य प्रभाकर काळेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
‘उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा’ या मतदान जनजागृतीचा उद्या राज्यस्तरीय शुभांरभ
निवडणूक यंत्रणांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचे निर्देश
कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न