सोलापूर, 5 ऑगस्ट – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने “भावपूर्ण महाराष्ट्र” उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा सर्वांगीण विकास, कृषि पर्यटन, इको-टुरिझम व साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत नियोजन भवन, सोलापूर येथे पार पडणार आहे, अशी माहिती विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी दिली आहे.

कार्यशाळेचा उद्देश पर्यटन क्षेत्रातील स्थानिक अर्थवृद्धी, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण व शासकीय योजनांचा लाभ यावर केंद्रित असून, “पर्यटन धोरण 2024” च्या अंमलबजावणीसाठी जिल्हा स्तरावर समन्वय व धोरणात्मक दिशा ठरविणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
🔹 अपेक्षित सहभागी घटक:
- ट्रेकर्स, गिर्यारोहक
- पर्यटन मार्गदर्शक
- होमस्टे/हॉस्पिटॅलिटी सेवा देणारे
- ट्रॅव्हल्स ब्लॉगर्स व सोशल मीडिया मार्केटर्स
- साहसी खेळ व इव्हेंट आयोजक
- पर्यटन संस्था व स्थानिक उद्योजक
- युवक, महिला बचत गट सदस्य व महिला उद्योजक
🔹 कार्यशाळेतील मुख्य बाबी:
- नवीन व अनभिज्ञ पर्यटन स्थळांचा विकास
- साहसी व इको-टुरिझम संधी
- पर्यटन व स्थानिक भागधारकांमध्ये समन्वय
- शासकीय योजनांची माहिती (अनुदान, आई योजना, बिगरव्याजी अर्थसहाय्य)
- महिला व बचत गट आधारित पर्यटन उपक्रमांना चालना
या क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिक व अनुभवी व्यक्तींना विशेष आमंत्रण देण्यात आले आहे. इच्छुक व्यक्तींनी व संस्थांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवावा.
याविषयी अधिक माहितीसाठी 8080035134 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
More Stories
प्रा. संजय पाटील यांची श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी च्या कनिष्ठ शाखेच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती
विशेष लेख:- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण: बेघर व्यक्तीसाठी एक महत्त्वकांक्षी योजना
उमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक, बापूसाहेब चोबे यांनी केले शक्तीप्रदर्शन