बार्शी – लायन्स इंटरनॅशनल प्रांत ३२३४ ड १ विभाग एक, उपविभाग ४, लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी, मेगा इव्हेंट यांच्या अंतर्गत पर्यावरण संवर्धन या उपक्रमांतर्गत ५00 वृक्षांची लागवड दिनांक ११ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता डॉ. हिरेमठ हॉस्पिटल, बार्शी येथे करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून MJF ला अमित इंगोले (प्रांतीय सभापती मेगा इव्हेंट) तसेच बार्शी तील पत्रकार बंधु व हिरेमठ हॉस्पिटल मधील डॉक्टर्स व तेथील स्टाफ आणि लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.

यावेळी क्लब च्या अध्यक्षा ला. विद्या काळे यांनी मनोगत व्यक्त केले. भावी पिढी ना भविष्यातील वाढते तापमान व पर्यावरण संतुलन बिघडल्यामुळे होणारा धोका टाळण्यासाठी आज चा मेगा इव्हेंट महत्त्वाचा आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही हे छोटे पाऊल उचलले आहे.
यावेळी प्रांतीय सभापती अमित इंगोले यानी देखील आपल्या भाषणात बोलताना ही माहिती दिली की त्यांच्या मार्गदर्शना खाली आजच्या दिवसात बार्शी मध्ये विविध लायन्स क्लब तर्फे मिळून जवळपास ५७०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे. बार्शी मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजन पार्क तयार करण्याच्या त्यांच्या उपक्रम बद्दल तसेच या वर्षांत त्यांच्या मार्गदर्शना खाली रबावण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांच्या बद्दल देखील त्यांनी माहिती दिली.
हिरेमठ हॉस्पिटल येथे चिंच, कडुलिंब, रिठा, अंजन या सारखी वेगवेगळी देशी ५०० रोपे लावण्यात येत आहेत. या वेळी अनेक पत्रकार बंधू आणि त्यासोबतच बार्शी शहरातील प्रसिद्ध उद्योजक, डॉक्टर्स यांचा तेजस्विनी क्सलब तर्फे सत्कार करण्यात आला. तेजस्विनी क्लबच्या सदस्या ला. डॉ सौ. गौरी गायकवाड यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून काम पहिले. आलेले प्रमुख पाहुणे, डॉक्टर्स, पत्रकार व क्लबच्या सर्व सदस्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्व नियोजन डॉ. हिरेमठ हॉस्पिटल मधील कृष्णा गाढवे आणि संतोष जाधव यांनी केले.
या वृक्षारोपण करण्यासाठी रोपे मिळवून दिल्याबद्दल विभागीय वन अधिकारी बार्शी, वन परीक्षेत्र अधिकारी बार्शी आणि खोपा फौंडेशन चे योगेश चौधरी यांची प्रचंड मोलाची मदत मिळाली.
क्लब च्या सचिवा ला प्राची जमदाडे यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ