कवी कालिदास मंडळ बार्शी आयोजित कवी कालिदास महोत्सव २०२४ अंतर्गत
कै.मारुती त्रिंबक घावटे यांचे स्मरणार्थ कवी आबासाहेब घावटे यांचेकडून घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय काव्य लेखन स्पर्धेत कवी युवराज जगताप(काटेगाव) यांच्या “आषाढीची वारी” या अभंग प्रकारातील काव्यरचनेस प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल त्यांना मातृमंदिर सभागृह ढगे मळा बार्शी येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.अनिल बनसोडे (प्रशासनाधिकारी) व प्रख्यात साहित्यिक व कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी मा.श्री.अंकुश गाजरे (पंढरपूर), मा.श्री.हरिश्चंद्र पाटील (टेंभुर्णी) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

प्रसंगी मेघदुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या कवयित्री मा.जयश्री कुलकर्णी अंबासकर (नागपूर) कवयित्री मा.वैशाली भागवत (बडोदा),मसाप बार्शी शाखेचे अध्यक्ष मा.श्री.पा.न निपानीकर सर कवि कालिदास मंडळाचे अध्यक्ष मा.श्री. रामचंद्र इकारे सर,ओन्ली समाजसेवी संस्था,बार्शी चे अध्यक्ष मा.श्री.राहुल वाणी व त्यांचे सहकारी,त्याचबरोबर कवी कालिदास मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली