सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीदरम्यान टेंभुर्णी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी कोर्ट ड्युटी बजावताना चालू वर्षात 11 आरोपींना शिक्षा लावणेबाबत कामकाज पाहिले आहे. त्यामधील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा लागली आहे.

सदर त्यांची कामाची दखल घेऊन उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा सन्मान सोलापूर येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी केला.
अमृत खेडकर यांनी कोर्ट ड्युटी बजावताना त्यांच्यातील कर्तव्यदक्षता बद्दल जो त्यांचा सन्मान झाला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
More Stories
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
आमदार निवास व्यवस्था समितीच्या अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी
उळे येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली