सैन्यदलातर्फे त्यांचा खर्च करण्यात आला होता; मात्र राज्य शासनाकडूनदेखील तेव्हा मानधन देण्यात येत होते. महान्यूज या पोर्टलवर त्यांची मुलाखत प्रकाशित झाली. त्यावरून अनेक दैनिके, साप्ताहिक यांनी बातमी केली.

याचा सकारात्मक परिणाम होऊन त्यांना तात्काळ ते मानधन मिळाले आणि पुढचा प्रवास सुखकर झाला. त्यामुळे त्यांच्या रोईंगच्या प्रवासात माहिती जनसंपर्क महासंचालनालय नाशिकच्या जिल्हा माहिती कार्यालयाचेही योगदान आहे,असे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकनळ यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय नाशिक येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अर्चना देशमुख, माहिती सहायक किरण डोळस, सिनेकॅमेरामन पांडूरंग ठाकूर, मनोज अहिरे, जालिंदर कराळे, अतुल सोनवणे यांसह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री. भोकनळ यांनी आतापर्यंतच्या प्रवासाचे विविध अनुभव उलगडून सांगितले. लहान असतानाच वडिलांचे निधन झाल्याने जबाबदारी आली. शिक्षण सुरू असताना काम करत होतो. तेव्हा सैन्यदलात भरती व्हायचे हेच ध्येय ठेवले होते. सैन्यदलात कार्य सुरू झाल्यावर रोईंग खेळ माहित पडला. मी सतत प्रशिक्षक सांगत गेले तसे करत गेलो. कमी वेळात अंतर पार करणे हे ध्येय होते. ध्येय पार करण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते मी करण्याचा प्रयत्न केला. रिओ ऑलिम्पिकमध्ये हुकलेलं पदक आशियाई स्पर्धांमध्ये मी रेकॉर्डब्रेक वेळेत अंतर पार केले आणि मिळविले. काम करत गेलो आणि यश मिळत गेले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी माध्यमांबाबत सखोल विश्लेषण करत बदलत्या माध्यमांचा कसा फायदा होत आहे, त्याबद्दल सांगितले. तसेच क्रीडा क्षेत्राबाबत ग्रामीण भागात असलेली क्षमता आणि त्यातून तयार होणारे खेळाडू याबाबत सांगितले. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाबाबत करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार