Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज

भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज

भविष्यवेधी शिक्षण काळाची गरज
मित्राला शेअर करा

भविष्यासाठी सक्षम व्यक्तिमत्त्व तयार करणे व जागतिक स्वीकार्यता असेल मूल विकसित करणे हे भविष्यवेधी शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. जगाच्या बदलाचे प्रगती प्रचंड आहे. बदलाच्या गतीशी जुळून घेतल्यास व्यक्ती उपयोगी ठरेल. आपल्याला आपले भविष्य घडवायचे असेल, भविष्यासाठी सक्षम विद्यार्थी घडवायचा असेल तर कायम अद्यावत रहावे लागणार आहे.

त्यासाठी कायम शिकावे लागणार आहे.शिक्षण म्हणजे learning to learn’ भविष्याचा अंदाज घेऊन सतत शिकत राहणारी, स्वतः ला कायम अद्यावत ठेवणारी मुले हीच  भविष्यासाठी तयार झालेली मुले असतील. प्रत्येक मुलांची शिकण्याची गती वाढवणे हे ‘भविष्यवेधी शिक्षण’ आहे.यासाठी मी माझ्या शाळेत घेत एक छोटासा नाविन्यपूर्ण उपक्रम येथे नमूद करणार आहे. ज्याचा माझ्या मुलांना स्वतः हून शिकण्यासाठी खूप उपयोग झाला आहे.


हा उपक्रम मी माझ्या मुलांना इयत्ता निहाय वर्गाच्या Whats app ग्रुपवर इंग्रजी वाचनाचा विद्यार्थ्याचा व्हिडिओ घरी पालकांच्या मदतीने बनवणे व share करायला लावतो त्यामुळे पालक व विद्यार्थी आपले वाचन कसे चांगले होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देतात आमच्या विद्यार्थ्यांचे वाचन घेणे यासाठी वर्गातील वेळ ही वाचतो व महत्त्वाचे म्हणजे मुलांमध्ये इंग्रजी विषयाची गोडी वाढली आहे, जे भविष्यवेधी शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
माझी मुले स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित झाली आहेत.

“भविष्यवेधी शिक्षण संकल्पना मांडलेय आपल्या वतीने मूल स्वतः हून शिकतयं हो, शिकू द्या त्यांना, त्यांच्या गतीने “

वनिता पांडुरंग कोकाटे
जि.प.प्रा.शा.पन्हाळवाडी ता.भूम, जि.धाराशिव.

सुंदर माझी शाळा गं
अज्ञानाचा फोडी डोळा गं
सुंदर माझी शाळा गं !धृ!
बाळगोपाळांचा भोवती
नित्य मेळा गं
सुंदर माझी शाळा गं !१!
अभ्यासाची लावी गोडी,
बाळा गं
सुंदर माझी शाळा गं !२!
सुवचनांनी भरलेला सदा,
भिंतीवरच्या फळा काळा गं
सुंदर माझी शाळा गं !३!
परसबागेत सजला छान
भाज्यांचा मळा गं
सुंदर माझी शाळा गं !४!
निरक्षरता, अंधश्रद्धेला,
घालती आळा गं,
ज्ञान दानाचा चाले नित्य
सोहळा गं
सुंदर माझी शाळा गं !५!
स्वरचित
वनिता पांडुरंग कोकाटे
जि.प.प्रा.शा.पन्हाळवाडी ता.भूम जि.धाराशिव