शालेय विद्यार्थांमध्ये वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ” पासवर्ड ” हा शैक्षणिक प्रकल्प प्रिसिजन फाऊंडेशन च्या माध्यमातून राबविला जातो.

या उपक्रमांतर्गत सोनामाता शाळा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलाटी,पापरी ता.मोहोळ व अरण ता माढा येथे झालेल्या कार्यक्रमात पासवर्ड स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना राजीव तांबे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
विज्ञान विषयातील गमतीदार प्रश्नोत्तरमध्ये पाऊस काळ्या ढगातून पडतो की पांढऱ्या? क कपाटाचा कि होल हँडल च्या खाली की वर? आणि का? सिलिंग फॅन क्लॉकवाईज की अँटी कलॉकवाईज फिरतो ? अशा पाठयपुस्तका बाहेरील प्रश्नांची गम्मत जम्मत राजीव तांबे यांनी आपल्या संवादातून सांगितली.
पासवर्डच्या या उपक्रमात सोनामाता शाळा, कमला नेहरू प्रशाला, जि. प. प्रा. शा. अंबिका नगर बाळे, बेलाटी, शाळा क्र ४ मोहोळ, अरण या शाळांचा सहभाग होता.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत