रयतेच्या सार्वभौम स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडावर श्री शिवछत्रपती महाराजांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद सहकुटुंब आले होते जनतेच्या भावनांचा आदर करत राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी उतरले. गडावर जाण्यासाठी राष्ट्रपतींनी रोपवे वापरला.
यावेळी छत्रपती परिवार , राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत राजसदरेवर अतिशय दिमाखदार सोहळा संपन्न झाला .
यावेळी राष्ट्रपती महोदयांना छत्रपती शिवरायांच्या पट्टा या शस्त्राची , मराठा धोप व सुवर्ण होणाची प्रतिकृती तसेच आज्ञापत्रातील एक उतारा आदरपूर्वक भेट म्हणून देण्यात आला . ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील वस्तूंच्या या प्रतिकृती माझ्यासाठी वंदनीय व प्रेरणादायी आहेत . या सर्व भेटवस्तू राष्ट्रपती भवनातील संग्रहालयात सन्मानपूर्वक ठेवण्यात येतील , ” असे राष्ट्रपती महोदयांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी , सुश्री स्वातीजी कोविंद , अ.सौ. युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती , युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती व पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होते .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण , भारतीय पुरातत्त्व खाते , रायगड जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती यांनी अथक परिश्रम घेतले . या सर्वांचे संभाजीराजे छत्रपती यांनी मनापासून आभार मानले.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान