Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > बार्शीचे सुपूत्र आयपीएस दत्ता शिंदे यांना राष्ट्रपती पदक

बार्शीचे सुपूत्र आयपीएस दत्ता शिंदे यांना राष्ट्रपती पदक

मित्राला शेअर करा

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील चिंचोली या खेड्यातील अल्पभूधारक, शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या दत्ता शिंदे यांनी आपल्या जिद्द, सचोटी आणि कर्तबगारीने इतिहास घडविला.

पोलिस खात्यातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल आजवर अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. आता त्यांना राष्ट्रपती पदकाने त्यांना गौरविण्यात आले आहे. स्वातंत्र्य दिनी राष्ट्रपती यांच्याकडून गुणवत्तापूर्ण सेवा पदक” देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे.