पंतप्रधान मोदी 1 ऑक्टोबर रोजी इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये 5G सेवा लॉन्च करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवांचा शुभारंभ होणार आहे. त्याचवेळी मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानात सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 चे उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 च्या सहाव्या एडिशन मध्ये 5G सेवा सुरू करणार आहेत.
सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 5G सेवांचा शुभारंभ नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावाच्या अनुषंगाने झाला आहे, ज्यामध्ये 1,50,713 कोटी रुपयांच्या एकूण महसूलासह 51,236 MHz दूरसंचार सेवा प्रदात्यांना वाटप करण्यात आले होते या Provider कंपन्यांनी दिवाळीपर्यंत देशात फाइव्ह जी सेवा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. सुरूवातीच्या टप्प्यात निवडक शहरात फाइव्ह जीची सेवा मिळणार आहे.
More Stories
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार