Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > लाइफ स्टाइल > प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान

प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान

प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
मित्राला शेअर करा

येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे राहुल पालके यांना इंग्रजी विषयात विद्यावाचस्पती प्रदान करण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ , सोलापूरकडून देण्यात आलेल्या त्यांच्या पीएच.डी.चा विषय Exploring the Socio-Cultural and Historical Aspects in the Select Novels of Amitav Ghosh (अमिताव घोष यांच्या निवडक कांदबरीतील सामाजिक- सांस्कृतिक व ऐतिहासिक घटकांचा शोध घेताना’) हा होता. याप्रसंगी बहिःस्थ पर्यवेक्षक प्राचार्य डॉ. दिगंबर गंजेवार, अध्यक्ष डॉ. वसंत कोरे, मार्गदर्शक डॉ. एच.के. आवताडे, इंग्रजी विभागप्रमुख व सिनेट सदस्य डॉ. समाधान पवार उपस्थित होते.

पालके यांनी त्यांच्या प्रबंधातून भारतीय कांदबरीचा उहापोह मांडला आहे. अमिताव घोष यांच्या निवडक कांदबऱ्यांमधील सामाजिक-सांस्कृतिक व ऐतिहासिक पैलू यावर भाष्य केले. त्याचबरोबर समाजातील विविध व्यंगावर भाष्य करताना त्यांनी अस्पृश्यता, वर्ग संघर्ष , जातीय संघर्ष, दंगल,हिंदू- मुस्लिम संघर्ष, सांप्रदायिकतावाद आदींचे संदर्भ मांडले आहेत. वसाहतवाद व साम्राज्यवादाची मांडणी करत त्यांनी द्वितीय विश्व युद्ध, भारताची फाळणी, आंग्ल-बर्मा युद्ध, हुमेन युद्ध, अफूचे युद्ध आदी घटनांचे विश्लेषण प्रबंधात केलेले आहे. दुर्लेक्षित केला जाणारा सामान्य माणसांचा व वंचितांचा इतिहास त्यांनी आपल्या लेखणातून रेखाटला आहे. त्यांच्या संशोधनातून स्थानिक व जागतिक विचार मांडला असून बहुसांस्कृतिता व बहुभाषेचा संदर्भ आहे. त्यांचे संशोधन व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर व समाजोपयोगी आहे.

त्यांच्या या यशाबद्दल श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, प्राचार्य ए. बी. शेख, प्रा. अनिल कट्टे, प्रा. अशोक कदम, प्रा. कल्याण साठे, डॉ. सदाशिव माने, डॉ. सोमनाथ यादव, डॉ. अशोक अनमुलवार, डॉ. गणेश संकपाळ, डॉ. सुशांत काकडे इतर प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी, मित्रगट व बार्शीकरांनी त्यांचे अभिनंदन केले.