Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > पुरोगामी विचारमंच बार्शी, पुरस्कार वितरण सोहळा

पुरोगामी विचारमंच बार्शी, पुरस्कार वितरण सोहळा

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त पुरोगामी विचारमंच ता. बार्शी यांनी दि १७/४/२०२२ ते २०/४/२०२२ पर्यत वेगवेगळे उपक्रम आयोजित करत जयंती साजरी केली.
मित्राला शेअर करा

महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमीत्त पुरोगामी विचारमंच ता. बार्शी यांनी दि १७/४/२०२२ ते २०/४/२०२२ पर्यत विविध उपक्रम आयोजित करत जयंती साजरी केली. दि १७/४/२०२२ रोजी या पुरोगामी विचारमंच बार्शी यांनी प्रमुख वक्ते प्रा. डाॅ कमलाकर कांबळे यांचे परीवर्तन चळवळीची दिशा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


दि १८/४/२०२२ रोजी प्रमुख वक्ते काॅ. प्रा.तानाजीराव ठोंबरे यांचे डाॅ बाबासाहेब आंबेडकरांंचा वैचारीक वारसा या विषयावर व्याख्यान ठेवले होत. दि १९/४/२०२२ रोजी प्रमुख वक्ते प्रा.चंद्रकांत खंडागळे यांचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर एक महामानव या विषयावर व्याख्यान ठेवले होते. आणी शेवटच्या दिवशी २०/४/२०२२ रोजी भिमशाहीर राजेश ननवरे बावीकर यांचा शाहीरी जलसा हा कार्यक्रम घेतला तसेच या दिवशी गुणवंंत विद्यार्थी शैक्षणिक, सामाजिक क्षेञात काम केलेल्या मान्यवरांचा बक्षीस, प्रमाणपञ, स्मृतीचिन्ह देवुन सन्मान केला.

या कार्यक्रमाचे आयोजक होते पुरोगामी विचारमंच बार्शी. रमेश गवळी ( अध्यक्ष) प्रा. अशोक वाघमारे,हरीश्चंद्र ननवरे(उपाध्यक्ष) पी एम शिंदे ( सचिव ) रमेश बगाडे सर,आस्तम चंदनशिव सर ( सहसचिव) नवनाथ कदम सर, कांबळे एन एम (खजिनदार) या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हनुन विष्णु कांबळे साहेब ( शिक्षणधिकारी सांगली), काॅ प्रा तानाजीराव ठोंबरे सर, चंद्रमणी बोकेफोडे,सत्यजित जानराव सर, विलास वाघमारे,बाळु भालेराव, प्रा.डी. डी. मस्के, श्री रमेश पालके सर,प्रा.विद्याधर सर, भिमराव कदम सर ,श्री प्रविण मस्तुद सर यांनी काम पाहीले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागनाथ सोनवणे सर, बी.आर देशमुख, श्री विकास वाघमारे, यांची सर्व सदस्य टिम यांनी परीश्रम घेवुन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमासाठी कायदेशीर सल्लागार म्हनुन अ‍ॅड आय. के. शेख व ॲड. उषा नंदकुमार पवार यांनी यशस्वी रित्या मार्गदर्शन केले.हा कार्यक्रमासाठी बार्शी शहरातील भिमप्रेमी, आणि विवीध संघटना यांचे सहकार्य लाभले.पुरोगामी विचार मंच बार्शी यांनी सर्व मान्यवर आणि बार्शीकराचे आभार मानले.

समाज कार्याची दखल घेवून पुरोगामी विचारमंच ता. बार्शी यांना केला सामाजिक कार्यकर्ते राहुल वाणी यांचा सन्मान …
पुरोगामी विचार मंच ता.बार्शी यांच्या वतीने ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी अध्यक्ष राहुल वाणी सर यांना सामाजिक कार्याची दखल घेत पुरोगामी विचार मंच ता. बार्शी यांनी राहुल वाणी यांना प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.

तसेच भैरवनाथ शिक्षण संस्था बार्शी संचलीत संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदीर बार्शी या शाळेचे सहशिक्षक अणि ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी तालुका उपाध्यक्ष श्री गणेश नारायण कदम यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.