आज नितीशा यांचे देशभरात कौतुक होत आहे, पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. नितीशा या लहानपणापासूनच अभ्यासू हुशार आणि जिद्दी होत्या. कॉलेज सुरू असतानाच त्यांनी यूपीएससीसाठी तयारी सुरू केली होती. समाजातल्या गरजू लोकांना मदत करण्याच्या इच्छेतून प्रशासकीय सेवेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. हे सुरू असतानाच फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बी.ए. ( सायकॉलॉजी ) पूर्ण केले. सप्टेंबर २०२१ मध्ये नागरी सेवा परीक्षेत देशात १९९ व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या. आता २६ मार्चपासून हैदराबाद नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

नितीशा यांचे हे यश उस्मानाबादकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद असून उस्मानाबादच्या युवकांमध्ये मोठी गुणवत्ता असल्याचे पुन्हा या निमित्ताने सिद्ध झाले आहे. युवकांनी संधीचा योग्य वापर केला तर केवळ स्वतःचेच नाही तर जिल्ह्याचे, देशाचे नाव ते मोठे करू शकतात हा विश्वास बाळगून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कुमारी नितीशा यांच्या यशाबद्दल लोकप्रतिनिधी व समाजातील सर्व घटकांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
आयपीएस कुमारी नितीशा यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
More Stories
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
डॉ. प्रविण मस्तुद यांच्या “मराठी भाषिक व्यंगचित्र पत्रकारितेचा इतिहास” या पुस्तकास चक्रधर स्वामी राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार