बार्शी येथे वृक्ष संवर्धन समिती च्या दिनदर्शिके चा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वृक्ष संवर्धन समितीच्या या दिनदर्शिकेच हे तिसरे वर्ष आहे. प्रत्येक पानावर विविध देशी झाडांची उपयुक्त माहिती तसेच पर्यावरण दिन विषयक माहिती आणि बार्शी शहर व परिसरातील घटनांचा यामध्ये उल्लेख असल्यामुळे ही दिनदर्शिका लोकांच्या पसंतीत उतरली आहे.
वृक्ष संवर्धन समितीच्या दररोजच्या निसर्ग सेवेच्या श्रमदानात सहभागी होणाऱ्या ध्यास कोचिंग क्लास च्या लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्रीमान रामभाई शाहा रक्तपेढीच्या कश्यपी हॉल मध्ये झालेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक रवी अण्णा राऊत डॉ. राहुल मांजरे पाटील गौतम भाई कांकरिया वन अधिकारी मनोज बारबोले सचिन वायकुळे,भगवान लोकरे, गणेश गोडसे, डॉ. प्रशांत मोहिरे, प्रा.शशिकांत धोत्रे, उमेश काळे आदी उपस्थित होते.
यावेळी मनोज बारबोले गौतम कांकरिया शशिकांत धोत्रे, सचिन वायकुळे यांनी आपल्या मनोगतात वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक केले. डॉ. सचिन चव्हाण यांनी दिनदर्शिके विषयी माहिती सांगितली आणि उदय पोतदार यांनी वृक्ष संवर्धनाची शपथ दिली.
यावेळी बार्शीतील कलाकारांना ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माधवराव देशमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र बंडे यांनी केले प्रस्ताविक उमेश नलवडे यांनी तर आभार डॉ. चंद्रकांत उलभगत यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायरा मुल्ला, राणा देशमुख, हर्षद लोहार, राहुल तावरे, महेश बकशेट्टी, सागर बिडवे, सौदागर मुळे, संतोष गायकवाड, सुधीर वाघमारे, योगेश गाडे, गणेश कदम, सचिन मस्के, डॉ. प्रवीण मिरगणे, डॉ. वासुदेव सावंत, सचिन थोरबोले, योगेश दरुरमठ, चंद्रकांत चोबे आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक