अंकुश शिंदे (कमिशनर ऑफ पोलीस पीसीएमसी) यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा दिमाखात पार.
ऑल इंडिया व्हिडिओ फोटो ट्रेड फेअर पुणे येथे तीन दिवसीय फोटोफेअरचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचा आज उद्घाटन समारंभ थाटामाटात पार पडला.
फोटोग्राफर बंधूंसाठी हे आयोजन लाभदायी ठरणार आहे कारण व्यवसाय वाढीसाठी फोटोग्राफर्सना जे हवं आहे ते सर्व कांही एकाच ठिकाणी उपलब्ध आहे याचा सर्व फोटोग्राफर बंधूंनी त्यांच्या व्यवसाया वाढीसाठी फायदा करून घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे उद्घाटक अंकुश शिंदे साहेब यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर महेशजी श्रीवास्तव, राधाकृष्ण चाकय्यात, रमणजी अग्रवाल, कांजीभाई शहा, रमेशभाई शहा आदी उपस्थित होते. यावर्षी पुणे मध्ये होत असलेले हे फोटो फेअर मागील वर्षाच्या तुलनेत खूपच मोठ्या प्रमाणात आयोजित केलेले असून यामध्ये विविध नामवंत कंपन्यांचे 300 स्टॉल तसेच फोटोग्राफी व्यवसायामध्ये लागणारे सर्व ॲक्सेसरीज, कॅमेरा सर्विसिंगची सोय ही करण्यात आलेली आहे. दररोज नामवंत मार्गदर्शकांचे फोटोग्राफी मधील मार्गदर्शनही मोफत होणार असून फोटोग्राफर बंधूंच्या व्यवसायातील अडचणी ओळखून सलग तीन दिवस रोज सात मेंटॉर्स मार्गदर्शक ही या अफेअर मध्ये उपस्थित आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे फोटोफेअरचे आयोजक अरविंद जैन अनिल जैन आणि सुमित जैन यांनी केलेले आहे.
महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यातून असोसिएशनच्या माध्यमातूनही बऱ्याच संघटनांनी उपस्थिती लावलेली असून त्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. फोटोग्राफर्स साठी अतिशय उत्तम नियोजन करण्यात आलेले असून लकी ड्रॉ ग्लॅमर फॅशन शो तसेच सर्व कांही पाहायला आणि डिस्काउंट मध्ये खरेदी करायला मिळाल्याचा आनंद फोटोग्राफरच्या चेहऱ्यावर यावेळी दिसून येत होता. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक आणि गोव्यातीलही फोटोग्राफर बंधूंनी या फोटो फेअरसाठी हजेरी लावुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक