पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ व विद्यापीठाच्या अंतर्गत येणारे शाळा, महाविद्यालय यांच्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या अँटी रॅगिंग कमिटीच्या सदस्यपदी पत्रकार महेश पांढरे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर Porf Dr. Prakash A. Mahanwar(Vice Chancellor) यांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे.
शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय अत्याचार या संदर्भात काम करण्यासाठी तसेच अशा विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या उपाययोजना करता येतील तसेच चांगल्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल यासाठी या समितीची स्थापना केली जाते.
त्यामध्ये पत्रकार महेश पांढरे यांची नाम निर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षात पांढरे यांनी विविध सामाजिक उपक्रमात अनमोल योगदान दिले आहे. तसेच सामाजिक जाणीव ठेवून लोकांना मदत करण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो.
राजकारण, प्रशासन, शिक्षण, कायदा या विषयावर त्यांचा चांगला अभ्यास असल्याने त्यांची समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
More Stories
तृतीयपंथीयांच्या जागतिक परिषदेसाठी बार्शीचे सचिन वायकुळे यांना निमंत्रण
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन