बार्शी:- श्री. शिवाजी महाविद्यालय, बार्शी च्या कनिष्ठ शाखेच्या पर्यवेक्षकपदी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रा. संजय पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. ए. बी. शेख यांनी प्रा. संजय पाटील यांचा प्रदीर्घ अनुभव विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि महाविद्यालयाच्या हितासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगत प्रा. पाटील यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, उपप्राचार्य प्रा. वायकर, क. कला समन्वयक डॉ. राऊत, भूगोल विषय प्रमुख प्रा. खंदारे, कनिष्ठ कला, विज्ञान तसेच कि. कौशल्य विभागाचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
More Stories
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर