Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > राहूल शिंदे यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचा गुणवंत शिक्षक पुरस्कार

राहूल शिंदे यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचा गुणवंत शिक्षक पुरस्कार

मित्राला शेअर करा

परंडा दि.28 तालुक्यातील शेळगांव येथील सनराईज इंग्लिश स्कूलच्या राहूल शिंदे यांना ‘गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

परंडा येथील पंचायत समिती सभागृहात महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत असलेल्या शिक्षकांना ‘महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन परंडा यांच्या द्वारे ‘सन्मान गुणवंत शिक्षकांचा’ असा पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला.

सदर सोहळ्यास उस्मानाबाद जि.प.चे कृषी सभापती दत्ता अण्णा साळुंखे, माजी जि.प कृषी सभापती नवनाथ आप्पा जगताप, परंडा पं.स चे गटशिक्षणाधिकारी अशोक खुळे साहेब,सर्व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व इंग्रजी,जिल्हा परिषद, हायस्कूल चे शिक्षक बांधव,मराठा सेवा संघ व संभाजीब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

उपक्रमशिल शिक्षक राहूल शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबर पत्रकारिता क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवलेला असून या क्षेत्रात शिवशंभो संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खा.छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईच्या वतीने ‘आदर्श दर्पण रत्न पुरस्कार’ आरोग्य सेवेतील कोरोना कळतील रक्तदान शिबिराच्या आयोजन कार्याबद्दल विश्वजन आरोग्य सेवा समितीचा ‘युवा प्रेरणा पुरस्कार’ मिळालेले आहेत.

यामुळे राहूल शिंदे हे शिक्षण, पत्रकारिता आणि समाजसेवा क्षेत्रात आदर्श कार्याच्या जोरावर पुरस्काराने सन्मानित होणारे एकमेव व्यक्तीमत्व ठरले आहेत.

प्रशालेच्या वतीने युवाउद्योजक संस्थापक जोतीराम जगताप, मुख्याध्यापक संभाजी देवकर, सहशिक्षक प्रकाश शिंदे, कैलास दैन यांनी शिंदे यांचे अभिनंदन करतांना पिढीला वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत मीरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य भांडवलकर सर यांनी केले तर आभार रॉयल पब्लिक स्कूल चे संस्थापक निशिकांत क्षीरसागर यांनी केले.
शिक्षकांना सन्मानित केल्याने महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे विविध क्षेत्रासह विद्यार्थी आणि पालक वर्गातून कौतुक होत आहे.