Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > बार्शीत पत्रलेखनाच्या माध्यमातुन वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश

बार्शीत पत्रलेखनाच्या माध्यमातुन वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश

बार्शीत पत्रलेखनाच्या माध्यमातुन वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश
मित्राला शेअर करा

वृक्ष संवर्धन समितीचा अनोखा उपक्रम.

भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या आमृत महोत्सवा निमित्त ९ ऑगस्ट क्राती दिनाचे औचित्य साधुन वृक्ष संवर्धन समिती बार्शी यांनी एकाच दिवशी दहा हजार पंचाहत्तर पत्र विद्यार्थी तसेच नागरी कां कडुन पत्त्यासहीत लिहुन घेतली. ती देशाच्या विविध भागात डाकविभागा द्वारे पोहचवलीही जाणार आहेत.

या उपक्रमा मध्दे शालेय विद्यार्थी तसेच नागरीकांनी ही प्रचंड उत्सहात सहभाग घेतला.त्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तिला एक पत्र लिहले आणि हर घर तिरंगा हर घर एक पेड हा संदेश दिला.या उपक्रमात बार्शी शहर व परिसरातील सर्व हायस्कुल तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उत्सहात सहभागी झाले व त्यांनी आपल्या आवडीच्या व्यक्तिला एक पत्र लिहुन एक झाड लावुन ते संवर्धीत करण्याचा आग्रह केला.या उपक्रमासाठी लागणारी सर्व पोष्ट कार्ड वृक्ष संवर्धन समिती कडुन मोफत पुरवण्यात आली.
प्रत्तेक शाळे समोर डाक विभागाने एक पोष्टाची पेटी ही ठेवली होती.प्रत्तेक विद्यार्थी पत्र लिहुन ते पोष्टाच्या पेटीत टाकत होते हे पाहुन जेष्ठांना वाटसअप ईमेल मुळे विस्मरनात गेलेल्या जुन्या आठवनींना उजाळा मिळाला तर विद्यार्थ्यांनाही पत्र लेखनाचा आनंद अनुभवता आला.
आज आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते फुकट मिळालेले नाही आनेकांनी आपल्या जिवाची बाजी लावुन बलीदान देवुन हे मिळाले आहे पन आजची पिढीला याची जाणीव नाही.देशा साठी आपणही काही तरी देण लागतो याच भावनेतुन आपणही निदान एक झाड लावले पहिजेआणि ते संवर्धीत केले पाहिजे तरच आपल्या देशाच्या वसुंधरेचे रक्षण होणार आहे आणि आपला देश आपल राज्य आपल गाव सुंदर हरीत होणार आहे.ही देखील मोठी देश सेवाच आहे याच उद्देशातुन या उपक्रमाच आयोजन करण्यात आल्याच वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी बार्शी शिक्षण मंडळ पर्यवेक्षक संजय पाटिल, माजी प्राचार्य शशिकांत धोत्रे, अजित नडगीरे,उदय पोतदार,राहुल तावरे,राणा देशमुख,सायरा मुल्ला,अक्षय घोडके,अमृत खेडकर,सुनिल फल्ले,अक्षय भुईटे,अशोक जाधवर,योगेश गाडे,अक्षय काटकर,समाधान विधाते,सौदागर मुळे,डॉ.प्रविन मिरगने,डॉ.वसुदेव सावंत,तेजस विधाते,अनमोल वाघमारे,उमेश नलवडे,संतोषकुमार गायकवाड,महेश पायघन,डॉ.सचिन चव्हाण सर,रेखा विधाते,अनुसया पवार,विरेंद्र भांडे, महेश बकशेट्टी,बुगडे सर,गणेश कदम,आदींनी परिश्रम घेतले.


या उपक्रमात खालिल शाळेंनी घेतला सहभाग.
महाराष्ट्र विद्यालय बार्शी.
सिल्वर ज्युबली प्रशाला बार्शी
सुलाखे हायस्कुल बार्शी.
सुलाखे इंग्लिश मेडियम बार्शी
बार्शी टेक्निकल हायस्कुल बार्शी.
सुयश विद्यालय बार्शी
महात्मा फुले विद्या मंदिर बार्शी
जिजामाता विद्यामंदिर बार्शी
साधना कन्या प्रशाला बार्शी
मॉडेल हायस्कुल बार्शी
कन्या शाळा बार्शी
न्यु हायस्कुल बार्शी
जनसेवा हायस्कुल बार्शी
अभिनव हायस्कुल बार्शी
दिलिप सोपल हायस्कुल बार्शी
सोजर इंग्लिश मेडियम बार्शी
एम आय टी स्कुल बार्शी
सेंट जोसेफ बार्शी
पोद्दार स्कुल बार्शी
अँग्लो उर्दु हायस्कुल बार्शी
ज्ञानज्योत क्लास बार्शी
गुळमिरे प्रशाका बार्शी
न्यु इंग्लिश स्कुल दडशिंदे ता.माढा
कन्या शाळा टेंभुर्णी ता.माढा
जिल्हा परिषद प्राथ.शाळ वाकडी ता.परंडा
लोकसेवा हायस्कुल अगळगाव
नविन मराठी शाळा वैराग
नागनाथ हायस्कुल घारी.