बार्शी :-येथे वृक्ष संवर्धन समितीकडून श्री शिवाजी महाविद्यालय परिसरात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्या समोरील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या मोहिमेत सर्व शिव परिसर साफ करण्यात आला समोरील रस्ता स्वच्छ करून तसेच रस्त्यावरील दुभाजकात वाढलेले गवत काढून हा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.

वृक्ष संवर्धन समितीकडून तीन वर्षापासून या स्वच्छता मोहिमेचे आयोजन शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात येते. गुरुवारी या मोहिमेची सांगता छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला जलाभिषेक घालून करण्यात आली. गेली पाच वर्ष वृक्ष संवर्धन समिती शहर आणि परिसरात झाडे लावून ती संवर्धित करत आहे तसेच विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबवून महापुरुषांना अनोखी आदरांजली समितीकडून वाहण्यात येते. या स्वच्छता मोहिमेत बार्शी शहरातील विविध संघटना शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामात बार्शी नगरपालिकेने देखील मोलाचे सहकार्य केले.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, बार्शी नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद, अतुल पाडे, राहुल तावरे, उमेश नलवडे,राणा देशमुख,डॉ.सचिन चव्हाण, अक्षय घोडके, योगेश गाडे समर्थ काळे,समर्थ तुपे चंद्रकांत चोबे,अक्षय भोईटे, गणेश कदम,आनंद धुमाळ, ओंकार राजमाने,अजित नडगिरे,संतोषकुमार गायकवाड,महेश बकशेट्टी, यश कदम, अमृत खेडकर,सायरा मुल्ला, अनुसया आगलावे,सुनील फल्ले,प्रज्वल मोरे यांनी परिश्रम घेतले.
More Stories
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते सोलापूर येथे स्पेन्का ग्रुपच्या भव्य कॉर्पोरेट कार्यालयाच उद्घाटन
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन