खा. राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. २५/१/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड बाधीत शेतकऱ्यांची भव्य आक्रोश परिषद व राज्यव्यापी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बार्शी येथील यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी. याठिकाणी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सुरत चेन्नई महामार्ग अधिग्रहण व बाधित शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग बाधीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व परिसरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मा. खा. राजु शेट्टी मार्गदर्शनाखाली राज्यव्यापी मेळाव्याची सुरुवात दि. २५/१/२०२३ पासून बार्शी तालुक्यातुन होत आहे. सोलापूर, उस्मानाबाद (धाराशिव), अहमदनगर, बीड इ. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
१) सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गाचा मोबदला / मावेजा समृद्धी महामार्गाप्रमाणे देण्यात यावा.
२) सर्व शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी असणारे वहिवाट रस्ते, शिवरस्ते बाधीत होऊ नयेत व सर्व्हिस रोड द्वारे महामार्गास जोडावे
३) या महामार्गामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक / भुमीहीन होणार आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून शासकिय लाभ देण्यात यावेत व पुनर्वसन करावे
४) ज्या शेतकऱ्यांची गट फोड झाली असेल अशा शेतकऱ्यांचे भूमापन शासनाने करुन प्रत्येकी स्वतंत्र नोंद घ्यावी. त्याच्या मोजनीचा खर्च शेतकऱ्यांवर लादू नये.
५) सर्व्हिस रोड, ट्रंपेट भागामध्ये बाधीत शेतकऱ्यांना व्यवसाय उभारण्यासाठी प्राधान्याने जागा द्यावी.
६) शेतकऱ्यांचा थकित पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, वीजबील माफी तसेच १२ तास दिवसा लाईटची मागणी या आक्रोश परिषदेमध्ये केली जाणार आहे.
७) गावठाण पासून ५०० मि. पर्यंतचे क्षेत्र एन. ए. प्रमाणे मोबदला देण्यात यावा.
८) रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक शेतकऱ्यांच्या वाहनांना व व्यक्तिंना कामामध्ये समाविष्ट करून घ्यावे.
सोलापूर जिल्हाध्यक्ष
शिवाजी (भाऊ) पाटील, अमोल हिप्परगे, कार्याध्यक्ष अजिनाथ परबत सोलापूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष विजू तात्या रणदिवे, धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री रविंद्र इंगळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष – श्री रवि मोरे, बीड जिल्हाध्यक्ष श्री कुलदीप करपे, बार्शी तालुका अध्यक्ष हनुमंत कापसे युवा आघाडी बार्शी तालुका शरद भालेकर, तुळजापूर तालुक्यातील गुरुराज भोजने, नेताजी जमदाडे, धनाजी पेंदे, सत्यवान गायकवाड, परंडा – रामेश्वर नेटके जामखेड – सुनिल लोंढे उत्तर सोलापूर – विजयकुमार साठे, दक्षिण सोलापूर – दिनेश शिंदे अक्कलकोट – नरेंद्र पाटील भूम – परंडा – शिवाजी चवरे, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विविध जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत
बाधित होणाऱ्या शेतकर्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनओमप्रकाश पाटील, अॅड. प्रकाश गुंड, शिवाजी भाऊ पाटील यांनी केले आहे.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर