Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > रेशन दुकानांत मिळणार घरगुती गॅस सिलेंडर ?

रेशन दुकानांत मिळणार घरगुती गॅस सिलेंडर ?

केंद्र सरकारची नवीन योजना आता रेशन दुकानांत मिळणार घरगुती गॅस सिलेंडर
मित्राला शेअर करा

घरगुती गॅस सिलेंडर फक्त गॅस एजन्सी मधेच उपलब्ध असतात आणि त्यासाठी बूकिंग प्रोसेस आहे मोबाईल द्वारे आपण गॅस सिलिंडर मागणी नोंदवत असतो.

मात्र केंद्र सरकारने आता नवीन योजना आणलेली आहे यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर आता रेशन दुकानांत मिळणार आहे असे केंद्र सरकारने सांगितले.

काय सांगितले केंद्र सरकारने

केंद्र सरकारने म्हटले आहे की रेशन दुकानात आता छोट्या एलपीजी गॅस सिलेंडरची विक्री करण्यात येणार आहे या योजनेचे स्वरुप आणखी स्पष्ट झाले नसले तरी लवकरच ही योजना अमलात आणली जाणार आहे.

या योजनेचा हेतू रेशनची दुकान आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहारिक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे फूड सेक्रेटरी सुधांशू पांडे यांनी सांगितले

याचबरोबर सर्व ऑइल मार्केटिंग कंपन्यांसोबत यासंदर्भात करार करण्यात येईल असे पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालयाने सांगितले.