सोलापूर:- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे औचित्य साधुन आणि राज्यातील वाचन संस्कृती वृध्दीगंत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि.01 जानेवारी 2025 ते दि.15 जानेवारी 2025 या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा अनोखा उपक्रम राबविणेसाठी दि.20 डिसेंबर 2024 रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.
या उपक्रमांतर्गत सामुहिक वाचन, कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परिक्षण व कथन स्पर्धा हे कार्यक्रम राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. नवीन वर्षाची सुरवात समाजातील सर्व घटकांतील तसेच नागरिकांनी आपल्या आवडीचे पुस्तकाचे वाचन करुन करावी असे आवाहन मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे.
1 जानेवारी रोजी राज्यातील 6 हजार वर महाविद्यालयांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून या उपक्रमाच्या सुरुवातील सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या सभागृहामध्ये ग्रंथालयामध्ये सामुहिकरीत्या पुस्तकाचे वाचन सुरु केले आहे. यानिमित्ताने राज्यातील जवळजवळ 45 लाखाच्या वर विद्यार्थ्यांच्या हातात विविध प्रकाराची पुस्तके दिसून आलेत.
येत्या 15 दिवसांत सदर पुस्तक वाचन पूर्ण करण्याचा संकल्प या निमित्ताने प्रत्येक विद्यार्थ्यांने केला आहे. तसेच येत्या पंधरवडयात राज्यातील प्रत्येक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य वाढावे यासाठी वाचन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक लेखकांना महाविद्यालयात निमंत्रितकरुन विद्यार्थी – वाचक- व लेखक या परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. वाचन पंधरवडा निमितीत्ताने महाविद्यालयांमध्ये पुस्तक परिक्षण स्पर्धा आणि पुस्तक कथन स्पर्धा आयोजितकरण्यात आले आहे.पहिल्याच दिवशी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमास सोलापूर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी करुन घेतले व वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी त्यांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची निवड करुन पुस्तकासंबंधीचे अभिप्राय 15 दिवसांच्या आत महाविद्यालयास सादर करण्यासंबधी सुचित केले आहे. त्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उर्त्स्फुतपणे असा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
More Stories
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न
‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी
इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या हस्ते बार्शी तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन