Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > राज्यात लवकरच होणार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची भरती – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात लवकरच होणार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची भरती – राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यात लवकरच होणार तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांची भरती - राज्य सरकारचा मोठा निर्णय
मित्राला शेअर करा

स्पर्धा परीक्षा जागा भरतीच्या प्रतिक्षेत असणार्‍या असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. नुकतीच पोलिस भरती फॉर्म प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता महाराष्ट्रात लवकरच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांची पदभरती होणार आहे. महसूल विभागाच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, याबाबतचा आदेश जारी केला आहे.

किती जागांसाठी होणार भरती ?

राज्यात तलाठ्यांच्या 3110 पदांसाठी, तर मंडळ अधिकाऱ्यांच्या 518 अश्या एकूण 3682 पदांसाठी भरती होणार आहे. डिसेंबरअखेर किंवा जानेवारी महिन्यात या भरतीबाबतची जाहिरात निघण्याची शक्यता असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

‘एमपीएससी’ मार्फत तलाठ्यांच्या 3110 जागांसाठी, तसेच मंडळ अधिकाऱ्यांच्या 511 जागांसाठी ही भरती होणार आहे असे राज्य सरकारने म्हटले आहे

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी – हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा