बार्शी:- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महाराष्ट्र विद्यालय, बार्शी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती के. डी. धावणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांची जोपासना व्हावी यासाठी देशभक्तीपर गीते व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक एस. सी. महामुनी, पर्यवेक्षीका एन. बी. साठे, विद्यालयाचे माजी कर्मचारी व इतर मान्यवर तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
More Stories
तेर येथील नेत्र तपासणी शिबिरात ६०० रुग्णांची तपासणी; ५०० रुग्णांना चष्म्याचे वाटप
सुरेश डिसले यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान