पाटोदा- बार्शी ही बस पूर्वी पाटोदा दिघोळ जातेगांव निपाणी अंदरुड ईट सुकटा भूम माणकेश्वर बार्शी या मार्गे चालू होती परंतु मध्यानंतरी कोरोना कालावधीत बंद पडली नंतर ती चालू झाली नाही.

आरोग्य सेवेसाठी या परिसरातील नागरिकांना या परिसरात एक ही मोठे हॉस्पिटल नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिक आरोग्य सेवेसाठी बार्शी जिल्हा सोलापूर येथे डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल, हिरेमठ हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल इत्यादी मोठमोठे हॉस्पिटल आहेत. शिवाय या परिसरात कॉलेज व शालेय विद्यार्थी यांना शाळेत जाण्यासाठी एकही बस नाही. पाटोदा येथे कॉलेज चे विद्यार्थी जातात तर लांजेश्वर येथे शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी जातात.

श्री. अमोल भुसारी आगार प्रमुख जिल्हा बीड यांना श्री. सोमनाथ कोकाटे जिल्हा समनव्यक विश्व जन आरोग्य सेवा समिती धराशिव च्या वतीने पूर्ववत बंद असलेली बस पाटोदा बार्शी नव्याने चालू करण्याबाबत निवेदन दिले.
अमोल भुसारी आगार प्रमुख जिल्हा बीड यांनी गणपती विसर्जन नंतर पाटोदा बार्शी बस चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी प्रकाश तांबे वरिष्ठ लिपिक, गणेश जाधव लिपिक टॅंक, ज्ञानेश्वर सोनवणे वाहतूक नियंत्रक, महादेव नाईकवाडे वरिष्ठ लिपिक व राजेंद्र कोकाटे निपाणी ता. भूम हे उपस्थित होते.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय