पुण्यातील मेंटॉर श्री सचिन भोर सर आणि नागपूर येथील मेंटॉर श्री. के. गणेश सर यांचे सर्वत्र कौतुक होत असून एक हात मदतीचा रिस्पेक्ट उभारी कार्यशाळेतून 2 लाख 21 हजार ( 2,21,000/-) रुपयांचा रिस्पेक्टफुल मदतनिधी जमा करण्यात आला आहे.

फोटोग्राफर गोविंद नखाते रा. आवरगाव ता. धारूर जि. बीड यांना वैद्यकीय मदत निधी साठी कार्यशाळेचे बीड येथे आयोजन करण्यात आले होते. अभियानामार्फत कार्यशाळेच्या माध्यमातून मदतीसाठी फोटोग्राफर्स यांना आवाहन करण्यात आले होते. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातुन उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सदर ज्ञानदानाच्या कार्यशाळेत 350 हुन अधिक फोटोग्राफर्सनी सहभाग नोंदविला. यात महाराष्ट्रातील फोटोग्राफर्स आणि समाजातील लोकांनी मदतीचा हात पुढे करत 2 लाख 21 हजार ( 2,21,000/-) रुपयांचा रिस्पेक्टफुल मदतनिधी वैद्यकीय खर्चासाठी उभा करून दिला.

कार्यशाळेत पुण्यातील मेंटॉर श्री सचिन भोर सर यांनी क्रिएटीव्ह लाईटींग आणि नागपूर येथील मेंटॉर श्री. के. गणेश सर यांनी फोटोशॉप या विषयांवर मार्गदर्शन केले.
तसेच बीड मधील मेंटॉर श्री आनंद वाघ सर आणि सोलापूरचे मेंटॉर श्री आनंद मादास सर यांनीही उपस्थित फोटोग्राफर्स यांना मार्गदर्शन केले.
दौंड येथील स्नेह फोटोग्राफर संस्थेचे सदस्यही कार्यक्रमास उपस्थित होते. स्नेह फोटोग्राफर संस्थेतील सदस्य श्री. ललित गायकवाड सर यांनी आर्थिक नियोजन, पॉलिसी, इन्शुरन्स बद्दल माहिती दिली.
कार्यशाळेचे आयोजन आणि नियोजन करण्यात सिंहाचा वाटा उचलणार्या बीड जिल्हा कोअर टीम, मराठवाडा विभागातील सर्व फोटोग्राफर्स यांचे कार्य खरच कौतुकास्पद आहे.
सदर कार्यशाळेस कार्यालय, स्क्रीन, साउंड, जेवण स्पॉन्सर करणाऱ्या सर्वांचे आणि कार्यशाळेत महाराष्ट्रातून उपस्थित सर्व मान्यवरांचे, फोटोग्राफर्स यांचे रिस्पेक्ट फाउंडेशन ऑफ वेडिंग फोटोग्राफर्स महाराष्ट्र अभियानातर्फे सचिन भोर यांनी सर्वांचे मनापासुन आभार मानले.
More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ