बाशी: कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त, जगदाळे मामा हॉस्पीटल बार्शी व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय मार्गदर्शन शिबीर मंगळवार दि. २१/०१/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न झाले.
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मेडिकल सुपरीटेंडेंट डॉ. आर.व्ही. जगताप व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख, डॉ. धिरज जाधव, डॉ. इर्शाद शेख व सौ. सिंधु जाधव उपस्थित होते.
डॉ. आर. व्ही. जगताप यांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्व सांगितले. डॉ. धिरज जाधव यांनी डायबेटीस या रोगाची कारणे, लक्षणे तपासण्या व उपचार याविषयी सविस्तर स्लाईड शो व प्रश्नोत्तरासहित मार्गदर्शन केले. डॉ. इर्शाद शेख यांनी मणके व मेंदु रोगावरील उपचारासाठी फिजीओथोरपी ची गरज व उपकरणे व प्रश्नोत्तरासहित मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी सेवाभावी संस्थेचे सचिव श्री. डी.बी. पाटील, संचालक श्री. बदे एन.एस. श्री मोरे टी. एस. व सदस्य बहुजसंख्येने उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. विश्वास देशमुख यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. किरण गाढवे व उपस्थितांचे आभार प्रा. कल्याण घळके यांनी मानले.
More Stories
तेर येथील सहशिक्षिका सुनीता माने जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेत प्रथम
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम,२०१४
राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी सचिन देवकते यांची निवड