पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विद्यार्थिनी रिया दशरथसिंग परदेशी या विद्यार्थिनीची प्रजासत्ताकदिनी 26 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्ली, राजपथ येथे होणाऱ्या परेडसाठी निवड झाली आहे.

रिया परदेशीच्या या निवडीबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे रिया परदेशी ही शिक्षण घेत असून राष्ट्रीय सेवा योजना विभागातून तिची निवड झाली. दि. 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणाऱ्या सराव शिबिरात ती सहभाग होणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून रिया परदेशीला मार्गदर्शन लाभले. तिच्या या निवडीबद्दल कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे आदी उपस्थित होते.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक