Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ मे रोजी चंद्रपूर येथे

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ मे रोजी चंद्रपूर येथे

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ मे रोजी चंद्रपूर येथे होणार - कार्याध्यक्ष सुनील पाटणकर व बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सचिन बाबर
मित्राला शेअर करा

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन १ व २ मे रोजी चंद्रपूर येथे होणार असल्याचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर व बार्शी शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सचिन बाबर यांनी सांगितले.

या अधिवेशनात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आहे याच्याबरोबर वृत्तपत्र विक्रेत्यां अडचणी यावर चर्चा केली जाणार आहे.

यावेळी सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, अण्णासाहेब जगताप, संजय पावसे, राजेंद्र टीकार ताहेर काझी उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, सुनील पाटणकर यांनी माहिती दिली. हे अधिवेशन वेगळे आणि ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात सहभागी व्हावे, असे विभागीय संघटन सचिव विनोद पन्नासे यांनी सांगितले.