Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > रोजी रोटरी क्लब बार्शी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

रोजी रोटरी क्लब बार्शी राष्ट्र शिल्पकार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मित्राला शेअर करा

दिनांक 18 /9 /2021 रोजी रोटरी क्लब बार्शी मार्फत राष्ट्र शिल्पकार पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉ.रो.श्री सदानंद भिलेगावकर सर ,रोटरी क्लबचे अध्यक्ष विक्रम सावळे,सेक्रेटरी कौशिक बंडेवार व डॉ.विजयश्री पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. अनेक वर्षापासून रोटरी क्लब बार्शी मार्फत शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो, यावर्षी सात शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांची नावे हे पुढील प्रमाणे आहेत.


1.श्रीमती शोभा प्रल्हाद रणशूर(मेहेर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,बळेवाडी)

  1. श्रीमती शमशाद अ.गंनी सय्यद (शाहीर अमर शेख न. पा. शाळा क्रमांक 11,बार्शी)
  2. श्री उमेश विष्णू पाटील (महात्मा गांधी प्रशाला,काटेगाव)
  3. सौ लता रामकृष्ण मोरे(महात्मा गांधी प्रशाला, काटेगाव)
  4. श्री अजय सदाशिव टोपे (लोकसेवा विद्यालय, आगळगाव)
  5. सौ संगीता संदीप गायकवाड (किसान कामगार विद्यालय, उपळाई ठों.)
  6. प्रो. डॉ.उषा विठ्ठलराव गव्हाणे (श्री शिवाजी महाविद्यालय,बार्शी)

या कार्यक्रमात सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याबद्दल ची माहिती डॉ. विजयश्री पाटील यांनी सांगितली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भिलेगावकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की आज शिक्षकांबद्दल चा आदर विद्यार्थ्यांमध्ये कमी होत चालला आहे हा आदर वाढण्यासाठी शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या पालकांचीही व समाजाची तेवढीच जबाबदारी आहे.एखाद्या राष्ट्राचे भविष्य घडविण्यात शिक्षक खूप महत्त्वाची जबाबदारी निभावतात.या कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनल या संस्थेबद्दल श्री मधुकर डोईफोडे सर यांनी माहिती सांगितली,तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष श्री विक्रम सावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले,पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री उमेश पाटील व डॉक्टर उषा गव्हाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व रोटरी क्लब बार्शी चे आभार मानले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी श्री कौशिक बंडेवार यांनी केले. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त शिक्षकांची परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच बार्शी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष श्री विजय शहा,डॉ.श्री नारायण देशपांडे,श्री प्रमोद काळे श्री सुहास श्यामराज व रोटरी सदस्य सौ.स्मिता श्यामराज, श्री.अमित खटोड, श्री.रोहित कटारिया श्री.शैलेश वखारिया श्री पियुष कोटेचा, श्री आनंद महाजन,श्री.विशाल रगडे, श्री.कृष्णा सोमानी,मी श्री.सौरभ गुंदेचा,श्री.बळी डोईफोडे,श्री.आनंद बेदमुथा व श्री.अतुल कल्याणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.नेहा व कु.निकिता शिंदे यांनी केले.