बार्शी(प्रतिनिधी)- राज्यातील कोविडच्या तिसऱ्या लाटेमुळे राज्यातील सुरु झालेल्या शाळा पुनःश्च बंद करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला. त्या अनुशंगाने इयत्ता 10 वी चे कलाक्षेत्रातील वाढीव कला गुणांपासून विद्यार्थी वंचीत राहु नये व विद्यार्थ्यांचे आरोग्याचे दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांनी चित्रकला ग्रेड परीक्षा आयोजनाचे कलासंचालनालयास निर्देश दिलेले होते.
त्या अनुशंगाने कलासंचालनालयाने इयत्ता 10वी चे विद्यार्थ्यां करिता येता 22 व 23 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन प्रणालीव्दारे ग्रेड परीक्षा आयोजनाचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतू सदर ऑनलाईन परीक्षेचे आयोजनात असंख्य जाचक शर्तींचा समावेश करण्यात येवून या परीक्षेच्या पूर्वीचे 100 रु परिक्षा शुल्क ऐवजी 200 रुपये व त्यावर बँकींग शुल्क 19 रुपये असे 219 रुपये शुल्क आकारण्यात येवून परीक्षेचे आवेदन भरताना विद्यार्थ्याना डोमेसियल प्रमाणपत्राचीही सक्ती केली होती सदर परीक्षा विद्यार्थ्यांला स्वतःचे ॲंड्रॉइड मोबाईल कॅमेरासमोर घरीच तब्बल तीन तास बसुन हा चित्रकलेचा पेपर सोडवायचा होता.
परीक्षेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन करताना असंख्य अडचणी निर्माण झाल्या होत्या तर ज्या विद्यार्थ्यांकडे ॲंड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहे असे निवडकच विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ठ होऊ शकले असते परंतू राज्यातील 70 टक्के विद्यार्थ्यांकडे ॲंड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्याने गोर गरिब, ग्रामिण, आदिवासी भागातील विद्यार्थी आयोजीत ऑनलाईन ग्रेड परीक्षेपासुन वंचित राहीले असते त्यामुळे महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाने या ऑनलाईन परीक्षे बाबत सर्व तांत्रिक बाबींचे एकुण आजवर सात निवेदने दिलेली आहेत.
त्यावर कलासंचालकांना उत्तर देखील देता आले नसल्याने या परीक्षांबाबत घेण्यात आलेला निर्णय अखेर पुन्हा मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत व उच्च व तंत्र शिक्षण सचिव, कलासंचालक यांच्या कडे गेला. त्यावर विद्यार्थी हितार्थ या परीक्षांबाबत निर्णय निश्चित व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे मुंबई विभागीय अध्यक्ष मोहन माने व सर्व पदाधिकाऱ्यांनी यात सौ. निताताई राऊत प्रदेश महिला आघाडी प्रमुख, सौ. मिताली नायर सौ. मिरा चाफेकर, मुंबई विभाग सल्लागार श्री. सुनिल पवार, सौ. भारती जाधव कुमार गायकवाड, अनिल ठाकरे, रणजित गौंड, विनोद अडसुळे, श्री. बाविस्कर सर यांनी प्रत्यक्ष कलासंचालक, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांचे शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेवून सदर ऑनलाईन ग्रेड परीक्षा सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असुन यापरीक्षेचे आयोजन तात्काळ रद् करण्याची आग्रही मागणी लावून धरली त्या अनुशंघाने मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आपल्या मंत्रालयीन कक्षात संघटना प्रतिनिधी सर्व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करून या बैठकीत सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ऑनलाईन परीक्षेचे आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेवून शालांत परीक्षेचे आयोजनानंतर लगेच एप्रिल 2022 या महिन्यात शाळा स्तरावर पुर्वीचे प्रचलित परिक्षा आयोजना प्रमाणे परीक्षा आयोजित करण्याचे कलासंचालक यांना स्पष्ट निर्देश दिलेले असून या निर्णयामुळे ग्रामिण व आदीवासी भागातील विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता इयत्ता 10 वी चे शालांत परीक्षेनंतर एप्रिल महिन्यात या ग्रेड परीक्षेचे आयोजन होणार असुन या ऑनलाईन परीक्षेचे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याचीही तरतुद केली जाणार आहे.
सर्व सामान्य विद्यार्थ्यांचे हिताचा सकारात्मक निर्णय घेतल्याने मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब यांचे राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले, प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद शिंदे (हस्तेकर), रामचंद्र इकारे, प्रदेश उपाध्यक्ष, सुहास पाटील, प्रदेश सहचिटणीस, राजेश निंबेकर, प्रदेश कोषाध्यक्ष, विवेक महाजन प्रदेश सदस्य, नवाब शहा, प्रदेश सदस्य, रमेश तुंगार, प्रदेश सदस्य, आदिंनी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर