डॉक्टर सचिन ओंबासे यांची धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची ( प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे ) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्यतत्पर कामांमुळे सचिन ओंबासे यांचे प्राथमिक शिक्षण दहिवडी येथे झाले असून माध्यमिक शिक्षण मंचर या ठिकाणी झाले आहे तसेच सचिन साहेब यांनी वैद्यकीय क्षेत्रांमधून पदवी संपादित करून MBBS चे शिक्षण पूर्ण केलेले आहे परंतु त्यांना बालपणापासूनच प्रशासकीय सेवेची आवड होती त्यामुळे त्यांनी फक्त नावासाठी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी अभ्यासाची तयारी केली त्यांचे मामा डॉ सुदाम खाडे सचिव आरोग्य विभाग मध्यप्रदेश यांच्याकडून त्यांना स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी साठी मार्गदर्शन मिळाले.
ओंबासे यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले व भारत सरकारच्या टॅक्स विभागांमध्ये IRS या पदी नेमणूक झाली परंतु ध्येयवेडे सचिन ओंबाासे यांना च व्हायचे होते. दुसऱ्या टर्ममध्ये ओंबासे यांनी युपीएससीची परीक्षा दिली व त्या परीक्षेमध्ये IPS झाले व आयपीएस चे प्रशिक्षण चालू प्रशिक्षण पूर्ण केले व तिसऱ्यांदा त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली व त्या परीक्षेमध्ये ते महाराष्ट्रामध्ये 17 व्या क्रमांकावर परीक्षा उत्तीर्ण होऊन पास झाले व IAS या पदी यांची निवड झाली.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर साहेबांची पहिलेच पोस्टिंग गडचिरोली या ठिकाणी आदिवासी विकास प्रकल्प प्रमुख म्हणून नियुक्ती झाली तिथे अतिशय चांगल्या प्रकारे काम करून गडचिरोलीमध्ये स्पर्धा परीक्षांचे शालेय स्पर्धा विभागीय स्पर्धा चांगले आयोजन केले चांगले काम केल्याबद्दल शासनाने या कार्याची दखल घेऊन त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी त्यांची नियुक्ती केली. नियुक्ती झाल्यानंतर वर्धा जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांचा बदल्यांचा विषय फार दिवसापासून चालला होता हा विषय त्यांनी अत्यंत व्यवस्थित हाताळून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार करून वर्धा जिल्हा महाराष्ट्र मधील पहिला जिल्हा आहे की सर्वात प्रथम ऑनलाइन बदल्या चालू झालेल्या आहेत या त्यांच्या चांगल्या कामाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन संगणकीय बदल्या बाबत महाराष्ट्र शासनाने एक समिती गठित केली व त्या समिती मध्ये सदस्य म्हणून सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच वर्धा येथे बचत गटामार्फत सोलर पॅनेल तयार केले जातात महिला बचत गटांना त्यांनी खूप साहाय्य केले आहे. अतिशय चांगल्या प्रकारे सोलर एनर्जी चा प्रकल्प वर्धा येथे राबविलेला आहे त्यांनी प्रशासकीय कामाबरोबरच आपल्या गावच्या विकास कामांमध्ये मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या कार्य तत्परतेमुळे वडगाव येथे जनसुविधा या योजनेमधून ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले आहे व ते आता पूर्ण झालेले आहे गावांमधील भुयारी गटर योजना बहुउद्देशीय सांस्कृतिक हॉल ही कामे त्यांनी चालू विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेली आहेत.
वडगाव च्या विकास कामांमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे तसेच गावांमधील सर्वांशी आपुलकीने प्रेमाने वागणारे असे हे व्यक्तिमत्त्व गावांमधील कोणत्याही व्यक्तीने फोन केला तरी फोन उचलून त्याची प्रामाणिकपणे विचारपूस करून त्याची काही अडचण असेल तर ती अडचण अत्यंत पोटतिडकीने समजून घेऊन ती अडचण नेहमीच दूर करतात.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद