बार्शी, दि. ८ – येथील लेखक सचिन वायकुळे लिखित ‘ पत्रकारिता : शोध आणि बोध’ ग्रंथाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे. विद्यापीठांतर्गत चालवणाऱ्या जाणाऱ्या ‘ सर्टिफिकेट कोर्स इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ अभ्यासक्रमासाठी अभ्यासग्रंथ म्हणून विद्यापीठाने ही मान्यता दिली आहे.
सोलापूर विद्यापीठात वरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहे.या अभ्यासक्रमसाठी आतापर्यंत स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नव्हता.लेखक वायकुळे यांनी हा अभ्यासक्रम समोर ठेऊन हा ग्रंथ लिहिला आहे. पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी दिलेल्या अभिप्रायास अनुसरून ‘पत्रकारिता : शोध आणि बोध’ हा ग्रंथ विद्यापीठ कौशल्य विकास केंद्रांतंर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ अभ्यासक्रमासाठी परिपूर्ण असल्याने हा ग्रंथ अभ्यासक्रमास ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे,असे कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ.प्र.ना. कोळेकर यांनी दिलेल्या मान्यततेच्या पत्रात म्हटले आहे.
या ग्रंथाचे लेखक सचिन वायकुळे हे नामांकित प्रकारांपैकी एक असून शालेय विद्यार्थ्यांपासून जेष्ठ नागरिकांमध्ये एकरूप होऊन वागतात,अगदी कॉलेज जीवनापासून समाज कार्यात ही सहभागी असतात तसेच समाजातील अनेक तरुणांना मार्गदर्शन करत त्यांनी युवाशक्तीला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.
बार्शी सारख्या ग्रामीण भागात त्यांनी स्मार्ट अकॅडमी या आपल्या अद्यावत (Studio)भाषण केंद्राच्या माध्यमातून शॉर्ट कोर्सेस द्वारे बार्शी व परिसरातील हजारो लोकांना भाषण कला व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भात योग्य मार्गदर्शन करत अनेक वक्ते निर्माण केले आहेत.
त्यांच्या या ग्रंथाला हा मान मिळाला या निमित्ताने जेष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी वायकुळे यांचे अभिनंदन केले.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद