काल गर्दीत दिसेनासा झालेल वडाच झाड आज एकटच उभ दिसलं…..
कुतूहलाने जवळ गेले तर त्याच्या डोळ्यातून पाणी येताना दिसलं…..

तुझी तर काल सर्वत्र पूजा झाली आनंदी व्हायचं सोडून तू का रे रडतो असा, आनंद कसला काल तर झाली माझी दुर्दशा…
चांगल आहे तुम्ही आजही आठवता पौराणिक कथा,पण कधीतरी एका माझी हि व्यथा…
वर्षभर माझ्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या ताया, कालच्या दिवशी माझ्यासमोर नटून-थटून येतात…
सौभाग्याच्या नावाखालीम मलाच कैद करून जातात….
काल तर शिकली सवरलेली पोर देखील मला फेऱ्या मारायला आलीअन् वृक्ष लागवडीचा संकल्प ती चक्क विसरून गेली..
पुनर्जन्म असतो का नाही हे मला माहीत नाय, पण या जन्मात लोक मरत आहेत कारण ऑक्सिजन मिळत नाय…
हाच जन्म ऑक्सिजन अभावी धोक्यात असताना कशाला हवाय सात जन्माचा फंदा, ओळखून पर्यावरणाचा धोका प्रत्येक जोडप्याने एक झाड लावायला हव होते यंदा….
डोळे नको पुसुस रागिनी दे एक वचन,लावून एक वृक्ष कराल त्याचे संगोपन,वंश वाढेल आमचाही देऊ मुबलक ऑक्सिजन, करा मग आनंदाने याच जन्माचे नंदनवन….
लेखन
सौ. रागिनी शरद वासकर (पांगरिकर)
More Stories
छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गाढवे-चेडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले