तेर – हरी खोटे :- आई , संत भगवंत ही तीन माणसे सोडली तर या जगात सगळीच माणसे स्वार्थी आहेत या कलयुगात माणूस संताच्या विचारा शिवाय जगू शकत नाही असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी तेर येथे आयोजित किर्तन महोत्सवातील किर्तन रुपी सेवे दरम्यान बोलताना दिला.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबा काकांच्या ७५८ जन्मोत्सव सोहळा, ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव सांगता सोहळा, संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या संजीवनी समाधी सांगता सोहळा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा सदेह वैकुंठ गमन सांगता सोहळा यानिमित्त या तेर येथे वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक हभप रघुनंदन महाराज पुजारी व तेरसह परिसरात ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेसह भव्य दिव्य कीर्तन महोत्सवातील तिसऱ्या दिवशीच्या कीर्तन सेवे दरम्यान इंदोरीकर महाराज बोलत होते.
यावेळी तेरसह पंचक्रोशीतील जवळपास आठ ते दहा हजार भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांच्या हरी किर्तनास गर्दी केल्याने सभामंडप फुलून गेला होता यावेळी पुढे बोलताना महाराज म्हणाले की या जगात आई वडील संत, भगवंत हेच फक्त स्वार्थी नाहीत तर बाकी सगळ जग स्वार्थी आहे कारण आई, बापाला वाटत माझ्या लेकराच चांगलं व्हावं, संताला वाटत जगाच चांगलं व्हावं, भगवंताला वाटत सगळ्याचे चांगलं व्हावं जगात ही तीन माणसे सोडली तर अख्खं जग स्वार्थी आहे संत कधी देवाच्या भेटीला गेले नाहीत पण पंढरपूरहून संतासह पांडुरंग परमात्मा.
तेरला गोरोबा काकांच्या भेटीला आले ही संत गोरोबा काकांची महती आहे ज्यांना कुणाला संतांचा आशिर्वाद मिळाला त्याचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही असे इंदोरीकर महाराज यांनी आपल्या किर्तनात कथन केले त्याचबरोबर मोबाईलच्या अती वापरामुळे लहान मुलांसह तरुण पिढी बरबाद झाली आहे त्यामुळे सोशल मिडिया वरील अतिरेक थांबला पाहिजे असे आवाहनही महाराजांनी केले तसेच दारु जुगारामुळे तरुण पिढीचे वाटोळे झाले आहे अनेकांचे लाखो रुपये बुडल्याने अनेकांवर घर दार शेती गाड्या विकण्याची वेळ आली आहे.
यावेळी हभप आकाश महाराज शास्त्री, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, रचना कन्स्ट्रक्शनचे दत्तात्रय मुळे, रहेमान काझी, किर्तन महोत्सवाचे आयोजक हभप रघुनंदन महाराज पुजारी, दासोपंत स्वामी, हभप गोविंद महाराज पांगारकर, बापू नाईकवाडी, वितीश चौगुले, संजय जाधव, अमोल थोडसरे, हभप शुभम महाराज लोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान
इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनासाठी तेरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते शुक्रवारी रात्री हभप ज्ञानेश्वरी उपासक हभप चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
More Stories
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस’चा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ