नागपूर – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह भ प शिवाजीराव मोरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यातील पहीला पथदर्शी मंगळवेढा ते पंढरपुर हरीत वारी पालखीमार्ग हा संत तुकोबांच्या स्वप्नपुर्तीचा आदर्श अविष्कार अन पुढील हरीत वारी पालखी महामार्ग कार्याचा प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.
महाराष्ट्र ही अनेक संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून ओळखली जाते संतांचे आराध्य दैवत,लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले व महाराष्ट्रातील दक्षिणकाशी म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र पंढरपूर अर्थातच भक्तीचे पीठ म्हणजेच विठूनगरी युगे अठ्ठावीस विटेवर उभ्या असणाऱ्या सावळ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक वर्षी अनेक वैष्णव संतांच्या पालख्यांसमवेत पालखी मार्गावरून पंढरपूरकडे येत असतात असा पालखी मार्ग निसर्गमय व्हावा. यासाठी हरीत वारी प्रकल्प दुरदर्शी सर्वस्पर्शी दिशादर्शक हिताचा आहे .
पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षलागवड करण्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची पंढरीची वारी जशी निर्मल घडते अगदी तशीच पालखी महामार्गावरून पंढरीकडे येताना यापुढे सृजनशील हरित वारी घडणार आहे .
जगण्यासाठी माणसाला ऑक्सिजनची नितांत गरज आहे यासाठी ऑक्सिजन देणाऱ्या झाडांना जपणे काळाची गरज आहे मानव निर्मित पाण्याचा दुष्काळ हटविण्यासाठी झाडे लावणे हाच पर्याय आहे व त्यातूनच आटलेल्या नदया पुन्हा पाण्याने वाहताना दिसतील म्हणूनच रस्त्याच्या दोन्ही बाजुंना मंगळवेढा पंढरपूर हरीत पालखीमार्ग समोर ठेवून वड, कडूलिंब,पिंपळ,चिंच अशी देशी झाडे लावून झाडांचे संरक्षण केले जाणार आहे
महामार्गाच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवड व संवर्धन कामा मुळे देहु ते पंढरपूर व आळंदी ते पंढरपूर हे दोन्ही पालखी महामार्ग काही काळातच देशभरातील एक ग्रीन रोल मॉडेल म्हणून नावारूपास येण्यास मदत होणार आहे हरीत वारी संबंधित बैठकीस हभप श्री शिवाजी महाराज मोरे, श्री नरेंद्र वैशंपायन, व शिरिषजी आपटे उपस्थित होते.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत