बार्शी नगरपरिषद बार्शी माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत “ZERO WASTE जनजागृती उपक्रमाअंतर्गत” दि.28/01/2022 रोजी संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे माझी वसुंधरा प्रबोधन कार्यक्रम घेऊन विविध उपक्रम राबविण्यात आले.
ओला कचरा ,सुका कचरा ,घातक कचरा, सॅनेटाइज कचरा याबद्दल जनजागृतीपर प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ओन्ली समाजसेवा ग्रुपचे वाणी प्लॉट येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमुख मा श्री.राहूल वाणी सर प्रमुख पाहूणे म्हणुन उपस्थित होते तसेच पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी चे सदस्य मानकोजी ताकभाते, सोनु खंडागळे वृक्ष संवर्धन समितीचे गणेश गल्लीतकर हे देखील उपस्थीत होते.

यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यांनी परिसरात लावलेले वृक्षारोपण उपक्रमास शाळेने भेट दिली सामाजिक कार्यकर्ते श्री.राहूल वाणी सर परिसरातील नागरिक व शाळेतील शिक्षक वृंद यांनी वाणी प्लॉट येथील परिसर स्वच्छ केला.
श्री राहुल वाणी सर व मान्यवरांना सर्वांना पुढील सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. अशी माहिती श्रीमती स्वाती चांगदेव.(मुख्याध्यापिका) श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी. यांनी दिली.
More Stories
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर
महाराष्ट्र विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा उत्साहात संपन्न
नियोजन भवन येथे 7 ऑगस्ट रोजी “Soulful सोलापूर” उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन