सोलापूर, : अनेक पिढ्यापासून गायरान जमिनीवर असलेला ग्रामस्थांचा हिरावून घेऊ नये. राज्यात लाखोंच्या संख्येने असलेल्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ नये. शासनाने गायरान जमिनीवरील निवासी वापर तातडीने नियमाधीन करावा, अशी मागणी सरपंच परिषदेने केली आहे. या मागणीचे निवेदन परिषदेच्यावतीने महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे.

यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अॅड. विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा कविता घोडके-पाटील, पंडित ढवण, कुलदीप कौलगे यांच्यासह प्रमुख निवारा पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांना बेघर होऊ देणार नाही. काळजी करू नका, निवासी अतिक्रमणे नियमाधीन करू, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले असल्याची माहिती सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी दिली. गायरान जमिनीचा निवासी प्रयोजनाचा वापर नियमित करण्याबाबत शासनाकडून वारंवार सूचना व आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या अनास्थेमुळे गायरान जमिनीवर बांधलेली घरे व निवासी वापर नियमाधीन झाला नसल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर