उळे:- ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथील कृषीकन्यांनी जि. प. प्रा. केंद्र शाळा उळे येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जीवनावर माहिती देण्यात आली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये पहिली व दुसरी मधील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा, तिसरी व चौथी मधील विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा तसेच पाचवी ते सातवी मधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यासाठी कृषी कन्या कु. तेजस्विनी पाटील, कु. मयुरी सामल, कु. साक्षी शिंदे, कु. ऐश्वर्या संध्यास्थानम, कु. आकांक्षा यादव व कु. श्रुती शिंदे यांनी परिश्रम घेतले. यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रज्ञा कुदळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल तारीख
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी मध्ये रक्त तपासणी शिबीर संपन्न