तेर दि. २८:- लातूर येथे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत स्पर्धेत धाराशिव तालुक्यातील तेर मधील महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यालयातील धिरज रायबन याने ११० मीटर. व ४०० मीटर. हर्डल मध्ये प्रथम क्रमांक, सृष्टी लो बगाडे १०० मीटर. हर्डल मध्ये प्रथम क्रमांक, पूजा पिंपळे हिने ४०० मीटर हर्डल व बांबू उडी मध्ये द्वितीय क्रमांक, तर नांदेड येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत वैष्णवी माने हिने भारोत्तोलन मध्ये ८० किलो वरील वजन गटात प्रथम क्रमांक व पायल बंडे हिने भारोत्तोलन ८० किलो खालील वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला विजेत्यांची चंद्रपूर येथे मैदानी व रत्नागिरी येथे होणाऱ्या भारोत्तोलन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाडूंचे व क्रीडा मार्गदर्शक अजिंक्य वराळे यांचे अभिनंदन मुख्याध्यापक बेदरे जे. के, बळवंतराव एस. एस, कांबळे बी. डी, शितोळे एम.एन, पाटील एस. एस, गोडगे एस यु, देवकाते आर. एम, नितळीकर ए. बी, घाडगे एस. डी यांनी केले.
More Stories
मालवण येथे सागरी जलतरण स्पर्धा, फ्लिपर्स स्विम क्लब बार्शीच्या विद्यार्थ्यांचा शानदार सहभाग
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह