बार्शी:- गोविंद गुरु जनजातीय विद्यापीठ, बन्सवांडा (राजस्थान) येथे दिनांक 16 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ खो- खो स्पर्धेसाठी श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या गैरी राऊत, समीना मुलाणी, स्नेहल उबाळे, सुषमा बनसोडे तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिनांक 14 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हाॅलीबॉल स्पर्धेसाठी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या यश भाट यांची पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर संघात निवड झाली आहे. सदर खो-खो संघाचे सराव शिबिर डॉ. सुभाष मारकड व व्हाॅलीबॉल संघाचे सराव शिबिर प्रा. खंडू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी येथे चालू आहे.
या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरूण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, प्रबंधक प्रमोद जाधव, संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर, डाॅ. रामहरी नागटिळक प्रा.संजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश