सरावासाठी विद्यार्थी रवाना
सोलापूर, दि. 12 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील तीन विद्यार्थ्यांची दि. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनी मुंबईत होणाऱ्या संचालनासाठी (परेड) आणि एका विद्यार्थ्याची दिल्लीत होणाऱ्या संचालनासाठी निवड झाली आहे.
राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षामार्फत ही निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे यांनी अभिनंदन केले आहे. मुंबईसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगमेश्वर कॉलेजमधील नागवेणी स्वामी आणि प्रतिभा बगले यांचा तर वालचंद कॉलेजचा सोहेल पटेल या विद्यार्थ्याचा समावेश आहे.
तर दिल्लीतील संचालनासाठी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचा विद्यार्थी सत्यजीत चव्हाण याची निवड झाली आहे. त्याची निवड ही 20 ते 29 नोव्हेंबर 2022 दरम्यान गुजरात येथे झालेल्या सराव शिबिरातून झाली आहे. निवड झालेले सर्व विद्यार्थी मुंबई आणि दिल्लीला सरावासाठी रवाना झाले आहेत.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद