उस्मानाबाद ; १४१ उद्योजक आणि त्यांच्या उद्योगांमुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी सहकार्य होणार आहे
देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधुन उस्मानाबाद जिल्ह्यात ‘बुथ तेथे उद्योग/व्यवसाय’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला होता. राष्ट्रीय युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंदांच्या जयंतीपर्यंत १४१ नव उद्योजकांचे प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्राच्या मान्यतेसह बँकेकडे दाखल झाले आहेत. ‘आत्मनिर्भर युवक, आत्मनिर्भर उस्मानाबाद’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद व मोठे यश मिळत असुन या योजनेच्या अधिक महितीसाठी 8888627777, 9850509920 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.
या संकल्पनेला जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे व जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष श्री.सुशांत भुमकर यांचे मोठे सहकार्य लाभले. यातूनच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये उद्योग मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये पंतप्रधान व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व उद्योगासंदर्भात युवकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत स्वगुंतवणुक केवळ ५% ते १०% असुन १५% ते ३५% पर्यंत अनुदान मिळते. ५० लाखापर्यंतचे प्रकल्प या योजनेअंतर्गत सुरु करता येत असुन त्यासाठी किमान शैक्षणिक अर्हता ८ वी पास अशी आहे. रुपये १० लाखापर्यंत विना तारण कर्जाची सोय यात आहे. यामध्ये लहान मोठे १५० पेक्षा जास्त उद्योग अंतर्भुत आहेत असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्तम प्रतिसाद मिळत असून यामध्ये अर्ज केलेले दाळ उद्योग, लाकडी तेल घाणा, सुगंधीत तेल उत्पादन, अगरबत्ती उत्पादन, ब्युटी पार्लर, केश कर्तनालय, फॅब्रीकेशन, मत्स्य पालन, दुग्ध्द प्रक्रिया उद्योग, खवा उद्योग अशा व इतर उद्योगांची नोंदणी झाली आहे. आजवर ४६० पेक्षा जास्त प्रस्तावांची नोंद प्राप्त झाली असून २४० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी १४१ प्रस्ताव जिल्हा उद्योग हब केंद्रातून मंजुर करुन बँकेकडे पाठविण्यात आले आहेत व त्याचा पाठपुरावा चालु आहे.
आवडीचा उद्योग/व्यवसाय सुरु करुन आपला युवक आत्मनिर्भर व्हावा व याच माध्यमातून आपला जिल्हा आत्मनिर्भर व्हावा असा आपला मानस आहे. योजनेचे यश पाहुन जिल्हातील अधिकाधिक युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.
More Stories
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत
तेर येथील नृसिंह नवरात्र महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात 67 भक्तांचे रक्तदान
महाराष्ट्र विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती धावणे के.डी.मॅडम यांना ‘लायन्स क्लब बार्शी रॉयल तर्फे राष्ट्र शिल्पकार आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान